Posts

जागतिक लोकसंख्या दिवस 2023

Image
    जागतिक लोकसंख्या दिवस 2023- इतिहास युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्रामच्या गव्हर्निंग कौन्सिलने 11 जुलै 1987 रोजी जगातील पाच अब्जावे बालक युगोस्लाव्हिया येथे जन्माला आले. यामुळे वाढणाऱ्या लोकसंख्येविषयी जनमानसात जागृती निर्माण झाली. अखेर युनो ने पण याची दखल घेऊन 1989 सालापासून हा दिवस जागतिक दिन म्हणून घोषित केला. 1990 मध्ये, युनायटेड नेशन्स जनरल असेंब्लीने ठराव 45/216 द्वारे जागतिक लोकसंख्या दिवस साजरा करणे सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. लोकसंख्येच्या समस्यांबद्दल आणि पर्यावरण आणि विकासाशी त्यांचा परस्पर संबंधांबद्दल जागरूकता वाढवणे. पहिला जागतिक लोकसंख्या दिवस 11 जुलै 1990 रोजी 90 हून अधिक देशांमध्ये साजरा करण्यात आला. तेव्हापासून, असंख्य संस्था, संस्था आणि युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंड (UNFPA) देश कार्यालये, सरकार आणि नागरी समाज यांच्या भागीदारीत, लोकसंख्येशी संबंधित चिंतांकडे लक्ष वेधण्यासाठी हा दिवस साजरा करत आहेत. जागतिक लोकसंख्या दिवस 2023-थीम युनायटेड नेशन्सच्या मते, या वर्षीच्या जागतिक लोकसंख्या दिवसाची थीम आहे – स्त्री-पुरुष समानतेची शक्ती उंचावणे: आपल्या जगाच्या अनंत

Water Cycle (जलचक्र)

Image
 

एल निनो, ला निनो

Image
  पृथ्वीच्या एकूण  भूपृष्ठापैकी सुमारे 29%भाग भूखंडांनी व्यापला असून 71%भाग जलाशयांनी व्यापलेला आहे. यामध्ये प्रामुख्याने समुद्र, सागर, उपसागर व महासागरांचा समावेश होतो. पृथ्वीच्या  पृष्ठभागावर अथांग पसरलेले सागर, उपसागर वरून शांत दिसत असले तरी या महासागरामध्ये भरती- ओहोटी, सागरी लाटा व सागरी प्रवाह या तीन प्रकारच्या हालचाली होत असतात.सागर व महासागर हे अशांत असून त्यामध्ये प्रामुख्याने दोन प्रकारचे शीत व उष्ण सागरी प्रवाह सातत्याने वाहत असतात.   सागरी प्रवाह :- म्हणजेच निश्चित दिशेने होणारी सागरजलाची हालचाल. या शीत व उष्ण सागरी प्रवाहांमुळे सभोवतालच्या प्रदेशातील हवामानावर परिणाम होतो. या विविध प्रवाहांपैकी एल निनो उष्ण सागरी प्रवाह तर ला निनो हा शीत सागरी प्रवाह म्हणून ओळखला जातो. एल निनो निर्मिती पूर्व ,मध्य विषुवृत्तीय व पॅसिफिक महासागरामध्ये तसेच पेरूच्या किनारपट्टीच्या जवळून वाहणारा उष्ण सागरी प्रवाह म्हणजेच एल निनो. पॅसिफिक महासागरामध्ये, दक्षिण अमेरिकेतील पेरू किनाऱ्याजवळ ,समुद्राच्या पृष्ठभागाच्या जलाची असामान्य तापमान वाढ होऊन मध्य आणि पूर्व पॅसिफिक महासागरात हवेचा दाब कमी हो