Posts

Showing posts from April, 2023

एल निनो, ला निनो

Image
  पृथ्वीच्या एकूण  भूपृष्ठापैकी सुमारे 29%भाग भूखंडांनी व्यापला असून 71%भाग जलाशयांनी व्यापलेला आहे. यामध्ये प्रामुख्याने समुद्र, सागर, उपसागर व महासागरांचा समावेश होतो. पृथ्वीच्या  पृष्ठभागावर अथांग पसरलेले सागर, उपसागर वरून शांत दिसत असले तरी या महासागरामध्ये भरती- ओहोटी, सागरी लाटा व सागरी प्रवाह या तीन प्रकारच्या हालचाली होत असतात.सागर व महासागर हे अशांत असून त्यामध्ये प्रामुख्याने दोन प्रकारचे शीत व उष्ण सागरी प्रवाह सातत्याने वाहत असतात.   सागरी प्रवाह :- म्हणजेच निश्चित दिशेने होणारी सागरजलाची हालचाल. या शीत व उष्ण सागरी प्रवाहांमुळे सभोवतालच्या प्रदेशातील हवामानावर परिणाम होतो. या विविध प्रवाहांपैकी एल निनो उष्ण सागरी प्रवाह तर ला निनो हा शीत सागरी प्रवाह म्हणून ओळखला जातो. एल निनो निर्मिती पूर्व ,मध्य विषुवृत्तीय व पॅसिफिक महासागरामध्ये तसेच पेरूच्या किनारपट्टीच्या जवळून वाहणारा उष्ण सागरी प्रवाह म्हणजेच एल निनो. पॅसिफिक महासागरामध्ये, दक्षिण अमेरिकेतील पेरू किनाऱ्याजवळ ,समुद्राच्या पृष्ठभागाच्या जलाची असामान्य तापमान वाढ होऊन मध्य आणि पूर्व पॅसिफिक महासागरात हवेचा दाब कमी हो