एल निनो, ला निनो

 पृथ्वीच्या एकूण  भूपृष्ठापैकी सुमारे 29%भाग भूखंडांनी व्यापला असून 71%भाग जलाशयांनी व्यापलेला आहे. यामध्ये प्रामुख्याने समुद्र, सागर, उपसागर व महासागरांचा समावेश होतो. पृथ्वीच्या  पृष्ठभागावर अथांग पसरलेले सागर, उपसागर वरून शांत दिसत असले तरी या महासागरामध्ये भरती- ओहोटी, सागरी लाटा व सागरी प्रवाह या तीन प्रकारच्या हालचाली होत असतात.सागर व महासागर हे अशांत असून त्यामध्ये प्रामुख्याने दोन प्रकारचे शीत व उष्ण सागरी प्रवाह सातत्याने वाहत असतात.

 सागरी प्रवाह:- म्हणजेच निश्चित दिशेने होणारी सागरजलाची हालचाल. या शीत व उष्ण सागरी प्रवाहांमुळे सभोवतालच्या प्रदेशातील हवामानावर परिणाम होतो. या विविध प्रवाहांपैकी एल निनो उष्ण सागरी प्रवाह तर ला निनो हा शीत सागरी प्रवाह म्हणून ओळखला जातो.

एल निनो निर्मिती



पूर्व ,मध्य विषुवृत्तीय व पॅसिफिक महासागरामध्ये तसेच पेरूच्या किनारपट्टीच्या जवळून वाहणारा उष्ण सागरी प्रवाह म्हणजेच एल निनो. पॅसिफिक महासागरामध्ये, दक्षिण अमेरिकेतील पेरू किनाऱ्याजवळ ,समुद्राच्या पृष्ठभागाच्या जलाची असामान्य तापमान वाढ होऊन मध्य आणि पूर्व पॅसिफिक महासागरात हवेचा दाब कमी होतो व वाऱ्यांच्या मार्गात, वेगात बदल होऊन हवामान चक्रावर विपरीत परिणाम होतो. म्हणजेच पृथ्वीच्या परिभ्रमणामुळे पूर्व पॅसिफिक महासागरातील वारे उबदार पाण्याला इंडोनेशियाकडे वाहून नेतात.तर वाढलेल्या तापमानामुळे पॅसिफिक महासागरात कमी दाबाचा पट्टा तयार होतो तर हिंदी महासागरात जास्त दाबाचा पट्टा तयार होतो,तेव्हा हिंदी महासागराकडून(पश्चिमेकडून पूर्वेकडे) मध्यपूर्व पॅसिफिक महासागराकडे वारे वाहू लागतात. सक्रिय मान्सूनसाठी हिंदी महासागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होणे आवश्यक आहे, परंतु एल निनो मुळे उलट परिस्थिती निर्माण होते व कमी दाबाच्या पट्ट्या ऐवजी जास्त दाबाचा पट्टा निर्माण होतो त्यामुळे  मान्सून कमकुवत होतो.म्हणजेच (मान्सून) पर्जन्य प्रमाणात घट होते. पॅसिफिक महासागराच्या तापमान व मान्सूनचा संबंध म्हणजेच मान्सूनवर एल निनो चा पडणारा विपरीत प्रभाव दिसून येतो.

Comments

Popular posts from this blog

जागतिक लोकसंख्या दिवस 2023